मनाचा गाभारा पंढरपूर आणि त्यातला आत्मा हाच विठ्ठल...
भक्ती हा आत्म्याला भेटण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे असं विवेकानंद म्हणाले आहेत. पण भक्ती म्हणजे विकारांच्या आधीन जाऊन केलेलं मंत्रपठण किंवा पूजाअर्चा नाही, तर आपल्या विकारांवर आपलं अधिपत्य ठेवून आत्म्या (देव, ईश्वर)चा जप करणं आहे, विकारांऐवजी विठ्ठलाच्या चरणी एकाग्र होणं आहे. आज न उद्या पंढरीला शरीररूपाने जाताही येईल, विठ्ठलाची मूर्ती डोळा भरून पाहताही येईल; पण खरंच त्या अद्वैताची गाठभेट होईल?.......